Sonal Patel । देशातील लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील निवडणूक नेहमीच रंजक होताना दिसून येते. मागच्या काही वर्षांच्या निकाल पहिले तर भाजपने या जागेवर रेकॉडब्रेक विजय संपादित केले आहेत. दरम्यान, गुजरातमाधील गांधीनगर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला होतो. दरम्यान, याच बालेकिल्ल्यात काँग्रेसने नवीन रणनीती आखात महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा करत भाजपला आव्हान दिलंय.
भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना पुन्हा एकदा गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनच संधी देण्यात आली. शाह यांच्याविरोधात काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी जाहीर केलीय . गुजरातमधील भाजपाचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गांधीनगरमध्ये अमित शाह विरुद्ध सोनल पटेल असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचार सभा घेण्यासही सुरुवात केलीय.
कोण आहेत सोनल पटेल? Sonal Patel ।
सोनल पटेल या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी आहेत. पटेल या वास्तुविशारद असून त्या यापूर्वी गुजरात काँग्रेस महिला शाखेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्या दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांचे वडील रमणभाई पटेलदेखील काँग्रेसचे नेते होते. वडील रमणभाई पटेल अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. सोनल पटेल काँग्रेसच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
मागील दोन लोकसभा निवडणूकीचे निकाल Sonal Patel ।
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते अमित शाह प्रथमच गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ५,५७,०१४ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांना ८,९४,६२४ मतं (६९.५८ टक्के) मिळाली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. सी. जे. चावडा यांचा पराभव केला होता; ज्यांना ३,३७,६१० (२६.२६ टक्के) मतं मिळाली होती. दोघांच्याही मतांची एकूण संख्या १२,८४,०९० होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे दिग्गज नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सहाव्यांदा ही जागा जिंकली होती. त्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी यांना ७,७३,५३९ (६८.०३ टक्के) मतं मिळाली होती. अडवाणी यांनी काँग्रेसचे उमेदवार किरीटभाई ईश्वरभाई पटेल यांचा ४,८३,१२१ मतांनी पराभव केला होता. पटेल यांना २,९०,४१८ (२५.५४ टक्के) मतं मिळाली होती. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार ऋतुराज मेहता १९,९६६ (१.७६ टक्के) मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघ
गांधीनगर हा गुजरातमधील लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघात १९८९ पासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून, लालकृष्ण अडवाणी आणि अगदी अलीकडे अमित शाह यांसारख्या उल्लेखनीय व्यक्तींनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. अडवाणी यांनी मध्ये गांधीनगर मतदारसंघातून १९९१, १९९८, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असा तब्बल सहा वेळा विजय मिळवला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये एकदा ही जागा जिंकली होती. परंतु, आपला लखनौ मतदारसंघ कायम ठेवण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही जागा सोडली.