मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने ‘हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी उत्सुक आहे.’ असे कॅप्शन दिले आहे. सोनाक्षीच्या या पोस्टनंतर तिने गुपचूप साखरपुडा उरकला असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने कॅप्शनही दिले आहे. ‘हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी उत्सुक आहे.’ मला अजूनही विश्वास बसत नाही. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीने एका मिस्ट्री मॅनचा हात धरला आहे. मात्र त्याचा चेहरा त्यात दिसून येत नाही आहे. दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तर तिसऱ्या फोटोंमध्ये सोनाक्षी तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सोनाक्षी सोबत असणारा हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या बोटातही डायमंडची अंगठी दिसत असल्याने तिने गुपचूप साखरपुडा उरकला की काय, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टची सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
सोनाक्षीचे नाव अनेकांशी जोडले गेले आहे. पण अभिनेत्रीने कोणत्या व्यक्तीशी साखरपुडा केला याचा खुलासा झालेला नाही. सोनाक्षी नाव सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदवासोबतही जोडले गेले आहे. याशिवाय अभिनेता झहीर इक्बालसोबतही तिचे नाव जोडले गेले आहे. सोनाक्षीच्या आगामी ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात ती झहीर इक्बालसोबत दिसणार आहे.