सोनाक्षी सिन्हा सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. अमॅझोन प्राईम टाईमच्या आगामी वेबसिरीजमध्ये सोनाक्षी काम करणार आहे. त्यामध्ये ती चक्क पोलीस निरीक्षक म्हणून दिसणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने निर्मात्यांनी या वेबसिरीजमधील सोनाक्षीचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आणला होता.
View this post on Instagram
आता याबरोबरच सोनाक्षीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आणखी एक प्रोजेक्ट आलेला आहे, असे समजते आहे. नेटफ्लिक्सच्या “बुलबुल तरंग’ या सिनेमात ती असणार आहे. ही एक रोमॅंटिक कॉमेडी फिल्म असणार आहे आणि लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सोनाक्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे वेगवेगळे विषय सध्या निवडते आहे.
View this post on Instagram
ऍक्टिंगमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाच्या दृष्टीने ते आवश्यक आहे, असे सोनाक्षीला वाटते. याशिवाय अजय देवगण आणि संजय दत्तच्या आगामी “भुज : द प्राईड ऑफ इंडिया’मध्येही ती दिसणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धावरील या सिनेमात सोनाक्षी एका गुजराती महिलेच्या भूमिकेत असणार आहे. भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी ती गावातील महिलांना तयार करते. तिने गावकऱ्यांबरोबर केलेल्या मदतीमुळे भारतीय सैन्य पाकिस्तानचा पराभव करू शकते, असे सिनेमात बघायला मिळेल.