सरपंचपदासाठी काही पण…; विजयी पॅनेलप्रमुखाला धमक्‍या

पुणे – गुंडांच्या मदतीने बिनविरोध निवडून येत इच्छुकांना सरपंचपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी धमकावण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांच्या पोलीस कोठडीतील 1 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. 

तुषार गोगावले (वय 28 रा. वडगाव बुद्रूक) या सराईताचे नाव आहे. या प्रकरणात विजय पोळेकर (22), विशाल कोतवाल (28), हृषिकेश पाटील (27) आणि चेतन कांबळे (20) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रामा मरगळे, अक्षय सुर्वे, नाना कुदळे, अभिजित सुर्वे, अक्षय दहिभाते, केदार भालशंकर, मयूर वाघमारे, सुरेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्याचे किरण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.18) हवेली तालुक्‍यातील मांडवी खुर्द परिसरात ही घटना घडली. 

फिर्यादी यांना मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे 70 लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता गोगावले याने मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मदतीने टोळी तयार केली. त्यांच्या मदतीने मांडवी बुद्रूक व गोगावले वाडी गावांत दहशत निर्माण करून बिनविरोध निवडून आला.

निवडणूक निकालानंतर विजयी पॅनेलप्रमुखाला सरपंचपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी शस्त्राच्या धाकाने धमकावले. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने पाच जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी, ही शस्त्र त्यांनी कोठून आणली, रामा मरगळे याने ही शस्त्र पुरवली आहेत. त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी गोगावले याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.