मुंबई – कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असते. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणले आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा ती अडचणीत सापडली आहे. गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी मुंबई पोलिसांकडे मानहानीची तक्रार केली होती.
याबाबत कंगनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा समन्स जारी केला होता. या प्रकरणात आज कंगनाची चौकशी होणार होती मात्र मुंबईबाहेर असल्याने कंगना चौकशीला उपस्थित राहिली नाही. निवेदनाद्वारे पोलिसांना तिने याची माहिती दिली. दरम्यान आता पुढील तारखेला पोलिसांकडून कंगनाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यावेळी कंगनाने अनेक कलाकारांवर ट्विट करत आरोप केले होते. तेव्हापासून जावेद अख्तर यांनी कंगना राणावत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.