शाहूनगर, गोडोली, त्रिशंकू परिसरातील नागरिकांचा निर्धार
सातारा – सातारा शहरालगतच्या शाहूनगर या त्रिशंकू भागात शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सोयी, सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. हद्दवाढीसारखा महत्त्वाचा प्रश्न बाबाराजे आणि उदयनराजेंच्या माध्यमातून सुटला आहे. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार असल्याने गोडोली, शाहूनगर, रामराव पवारनगर, विसावा नाका या भागातून दोन्ही राजेंना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात
आला.
भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी मोनार्क हॉटेल चौक, एमजेपी, एस.टी. कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बझार, जगताप हॉस्पिटल, कोल्हाटी वस्ती मशीद, मारुती मंदिर, माळी आळी, अभयसिंहराजे भोसले कमान ते राष्ट्रीय महामार्गाने म्हस्के वाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, गोडोली जकात नाका या मार्गावर झालेल्या पदयात्रेस नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
पदयात्रेत शिवेंद्रराजे, नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, अमोल मोहिते, जनार्दन जगदाळे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, धनंजय जांभळे, शेखर मोरे-पाटील, मनीषा काळोखे, प्रकाश बडेकर, नासीर शेख, राजू गोरे, सचिन सारस, बाळासाहेब शिंदे, निमिष शहा, सौ. स्नेहा नलवडे, सौ. सुनीता फरांदे, आशुतोष चव्हाण, अमित महिपाल, धीरज घाडगे, राजीव शिर्के, युवराज माटेकर, रणजित साळुंखे, व्यंकटराव मोरे, संतोष साळुंखे, योगेश जगताप, रवी पवार, महेंद्र देसाई, पप्पू घोरपडे, अमोल नलावडे, नितीन सूर्यवंशी, सागर साळुंखे, रोहन घोरपडे, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
युवक-युवतींनी सेल्फी घेण्यासाठी शिवेंद्रराजेंना गराडा घातला. भाजपशिवाय विकास नाही. त्यामुळे “हम भाजप के साथ, हम बाबाराजे के साथ’ अशा घोषणा युवकांनी दिल्या. शिवेंद्रराजे म्हणाले, शाहूनगर, विसावा नाका, शाहूपुरी हा भाग त्रिशंकू असल्याने विकासकामे करण्यास मर्यादा येत होत्या. त्यातूनही मी आमदार निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सोयी, सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. आता हद्दवाढीचा प्रश्न निकाली निघाल्याने या भागात गतीने विकासकामे करता येतील.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
उद्या, दि. 12 रोजी सकाळी 7 वाजता मोती चौक, मारवाडी चौक, सम्राट चौक, 501 पाटी, देवी चौक, वेलणकर बोळ, गुरुवार परज, शेटे चौक, कमानी हौद, एलबीएस कॉलेज, बाटा दुकान, नासीर शेख घर ते अमर जाधव घर या मार्गावर पदयात्रा निघणार आहे. सायंकाळी 6 वाजता फुटका तलाव आणि रात्री 8 वाजता गारेचा गणपती येथे कोपरा सभा होणार आहेत.