सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – सर्वांच्या घरी म्हणजेच उद्या श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. सोमेश्वरनगर परिसरातील मुख्य बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टेंसचे पालन करत, मूर्ती खरेदी करण्यासाठी परिसरातील वाघळवाडी, करंजेपूल, करंजे, मगरवाडी, देऊलवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी, सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, दरवर्षीपेक्षा यावर्षी मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण कमी होते.
सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नसल्यामुळे ५ ते १० फुटाचे गणेश मूर्तींचे स्टॉल यावर्षी बाजारात नव्हते. परंतु कुटुंबातली सदस्य गणेश मूर्ती घेण्यासाठी मात्र बाजारपेठ मध्ये दिसत होते. या मूर्त्यांमध्ये लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ गणपती व विविध आसनावर ती बसलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची मागणी बाजारपेठेत दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या घरगुती गणपतीचे उंची दोन फूट असावे म्हणूनच दोन फुटाच्या खालील गणेश मुर्त्या बाजारपेठ मध्ये दिसत आहे.
घरगुती श्री गणेशाच्या मूर्त्या शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. सार्वजनिक मोठ्या मंडळांना परवानगी नसल्यामुळे चार फूट आणि दोन फूट उंच मूर्ती बाजारात विक्रीला आहे. यावर्षी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची खंतही सुरज कुंभार या मुर्तीकाराने बोलून दाखवली.