काही निर्मात्यांनी विनाकारण सिनेमातून काढले होते- शिल्पा शेट्टी

सिनेसृष्टीतला आपला प्रवास सोपा नव्हता. कारण काही निर्मात्यांनी आपल्याला विनाकारण सिनेमातून काढले होते, असे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने म्हटले आहे. एका सोशल नेटवर्क साईटवर शिल्पाने आपली ही व्यथा मांडली आहे. आपल्या शिक्षणानंतर करिअरबाबत थोडेसे प्लॅनिंग केले होते. केवळ गंमत म्हणून एका फॅशन शो मध्ये भाग घेतला. त्यानंतर लगेचच हिरोईन म्हणून एका सिनेमाची ऑफर मिळाली आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितले नाही.

मात्र तरिही हा प्रवास खडतर होता. कारण काही निर्मात्यांनी कोणत्याही कारणाशिवाय आपल्याला सिनेमातून बाहेर काढले होते. त्या काळी शिल्पा केवळ 17 वर्षांची होती. त्यामुळे ती त्या निर्मात्यांना याबाब जाब विचारू शकत नव्हती. दुनियादारीचे हे फटके सहन करतच तिला सिनेसृष्टीचे अनुभव मिळवायला लागले. यशाबरोबर तिची सुद्धा पारख केली गेली. मात्र यासाठी तिची तयारी नव्ह्ती. शिल्पाने आता लिहीलेल्या पोस्टमध्ये या निर्मात्यांची नावे लिहीलेली नाहीत. मात्र नवोदित कलाकारांना निर्मात्यांकडून कसे वागवले जाते, याचे उत्तम उदाहरण मात्र तिने आपल्या चाहत्यांच्या समोर दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.