फातिमा सना शेखचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

फातिमा सना शेखने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेअर केला होता. त्यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आता. पण अभिनेत्रीने असे प्रत्युत्तर दिले की तिचे चाहतेही खुष झाले.

“दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखला ट्रोल्सने आपल्या निशाण्यावर घेतले होते. पण सना ही चुप बसण्या-यांपैकी नाही. तिनेही असे उत्तर दिले की ट्रोलरची बोलतीच बंद झाली.

त्याचे झाले असे की, सनाने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिच्या हातात कप दिसत आहे आणि तिच्यासमोर जेवनाची एक प्लेट दिसते. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “पिकनिक, हे माझे जेवन नाही.’
फातिमाने हे जेवन तिचे नसल्याचे स्पष्ट केले असतानाही काही ट्रोल्सनी तिच्यावर निशाणा साधला. “हा रमजानचा महिना असल्याने अशी पोस्ट करु नको, अन्य मुस्लिम बांधवांचे रोजे आहेत. त्याचा सन्मान कर.’

ही पोस्ट वाचल्यावर फातिमाने त्या ट्रोलला सडेतोड उत्तर दिले. तिने प्रथम ट्रोलरला टॅग केले आणि त्यानंतर त्याला कधीही ऑनलाईन न येण्याचा इशारा दिला. तुला जर फोटोचा ऐवढा त्रास होत असेल, तर तु सोशल मीडियावर येण्याचे बंद कर, असे उत्तर दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)