“ये साली जिंदगी’मध्ये झळकणार अदिती राव हैदरी

बॉलिवूडमधील अभिनेत्री लवकरच पुन्हा “ये साली जिंदगी’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मच्या टॉक शो वेळी अदितिने सांगितले की, या चित्रपटाच्या ऑडिशनवेळी एका अनओळखी व्यक्‍तीसोबत मला स्क्रिन शेअर करायची होती. ज्या व्यक्‍तीला मी ओळखतही नाही, अशा व्यक्‍तीसोबत चित्रिकरण करण्यास सांगितले.

अदिती ही अभिनेता अरुणोदय सिंह याच्याबाबत बोलत होती, ज्याने तिच्यासोबत चित्रपटात काम केले आहे. अदिती म्हणाली, त्यावेळेस मी त्याला ओळखत सुद्धा नव्हते. उंचपुडा असा तो माणूस होता. येथे काय सुरु आहे, हेच मला कळत नव्हते. पण अरुणोदय सिंह खूपच विनम्र आहे, असे तिने सांगितले.

या टॉक शोमध्ये अदितीने आपल्या खासगी जीवनातील अनेक पैलूही उलगडले. ती म्हणाली, मणिरत्नम यांच्या “बॉम्ब’ चित्रपटाने मला बॉलीवूडकडे आकर्षित केले. विशेष म्हणजे, या चित्रपटातील “कहना ही क्‍या…’ या गाण्याने माझ्यावर मोहिनीच घातली होती.

आपल्या खासगी आयुष्याबाबत अदितीने सांगितले की, पाचवीत असताना मला पहिले लव लेटर मिळाले. तर वयाच्या 21व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्याशी विवाह झाला आणि नंतर आम्ही दोघेही वेगळे झालो. त्यामुळे मला डेट कसे करतात हे माहीत नाही, असे अदितीने सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×