मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात रंगलेला शाब्दिक कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राने पहिला आहे. सोमय्या यांनी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व त्यांच्या नातलगांसह संजय राऊत यांच्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सोमय्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊत यांनी देखील सोमय्या व त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप लगावले होते.
राऊत यांनी लागवलेल्या अशाच एका भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. याच आरोपाप्रकरणी मेधा सोमय्या कोर्टात गेल्या होत्या.+ त्यांच्या तक्रारीनंतर मुंबईतील शिवडी कोर्टाने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना याप्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचे सांगितले होते. यानंतर कोर्टाने आता अटक वॉरंट काढल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत.
मीरा भाईंदर शहरात सार्वजनीक शौचालय बांधण्याचे काम मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. यात घाटोळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याविषयी माध्यमांशी बोलताना मेधा सोमय्या यांनी हे आरोप फेटाळत राऊत आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आपली बदनामी करत असल्याचे म्हणाल्या होत्या. तसेच त्यांनी शिवडी कोर्टात राऊत यांच्याविरोधात दाद मागितली होती.
सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत शिवडी कोर्टाने राऊत यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत हजर झाले नव्हते. त्यानंतर हे वॉरन्ट जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांचे अटकेचे वॉरंट निघताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पत्र देखील सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
Warrant issued against Sanjay Raut by Mumbai Metropolitan Magistrate for offence under sec 499, 500 IPC in complaint of Medha Kirit Somaiya
मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारीनी संजय राऊत यांच्याविरुद्ध कलम 499, 500 IPC साठी वॉरंट जारी केले pic.twitter.com/gLkvPR8YkM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 8, 2022