मुंबईतील सोसायटीत साकारला सौरऊर्जा प्रकल्प (भाग-२)

मुंबईतील सोसायटीत साकारला सौरऊर्जा प्रकल्प (भाग-१)

गुंतवणुकीचे आव्हान
इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी काही काळ विलंब लागला होता. कारण सरकारने सौर ऊर्जेच्या हार्डवेअरवरची सबसिडी परत घेतल्याने खर्चात वाढ झालीे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रिअल इस्टेट विकासकाने तसेच आर्थिक कंपन्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. अशा प्रकल्पात गुंतवणूक करून पर्यावरणपूरक चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे रहिवाशांना वाटते. कारण सौर ऊर्जेतून निर्माण होणाऱ्या एक यूनिटचा खर्च हा थर्मल पॉवरपेक्षा तुलनेने कमीच आहे. चांगल्या तंत्रज्ञानाचे सौर पॅनेल हे सुमारे शंभर टक्के बचत आणि दोन ते तीन वर्षांची हमी देतात. म्हणूनच अशा प्रकारच्या योजना या चांगल्या सिद्ध होऊ शकतात.

सौर ऊर्जेचा वापर केल्याने महानगरपालिका देखील मालमत्ता करात सवलत देते. अर्थात शहरानुसार ही सवलत वेगळी असू शकते. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस निधी हा मोठा मुद्दा असतो. मात्र, त्याशिवाय अन्य जसे की रेन हॉर्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यासारख्या इको फ्रेंडली पर्यायांचा वापर करता येईल का, याचाही विचार करायला हवा.

पर्यावरण संरक्षणात योगदान
सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज बिल कमी होणारच. त्याचबरोबर पर्यावरणपूरक कामाला हातभार लागेल. कारण त्याचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जनात घट होईल. नागरिकांनी देखील नवीन घराची खरेदी करताना इको फ्रेंडली घराबाबत आग्रही असावे. अर्थात गेल्या काही वर्षापासून अशा घरांना मागणी वाढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.