#DCvRR : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा फलंदाजीचा निर्णय

दिल्ली – नवी दिल्ली – तब्बल 7 वर्षांनी आयपीएलची बाद फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर आज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असून बाद फेरीत दुसरे अथवा पहिले स्थान पटकावण्याच्या दृष्टीने दिल्लीचा संघ प्रयत्नशील असणार आहे. तर, विजय मिळवून प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्नशील असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात दिल्ली येथील फिरोज शाह कोटला मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सकडून लागला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्स संघ –

अजिंक्य रहाणे, लियाम लिविंगस्टोन, संजू सैमसन, रियान पराग, स्टुअर्ट बिन्नी, कृष्णप्पा गौथम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपल, ईश सोढ़ी, वरूण आरोन, ओशन थॉमस.

दिल्ली कैपिटल्स संघ –

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कॉलिन इनग्रॅम, अक्षर पटेल, शेरफेन रूदरफोर्ड, इशांत शर्मा, कीमो पॉल, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.