प्राईस ग्रोथमध्ये तेजी

गेल्या अनेक वर्षांपासून देशातील मोठ्या शहरातील निवासी मालमत्तेच्या किमतीत स्थिरता राहिली आहे किंवा घसरण झाली आहे. मात्र, आगामी सहा महिन्यांत घराच्या किमती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सध्याच्या काळात मागणीत वाढ झाल्याने घराच्या विक्रीत वेग येण्याची शक्‍यता रिअल इस्टेट तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. रेपो रेटमधील कपात आणि जीएसटी सवलत यामुळे घरांच्या मागणीला वेग आला आहे. ज्या ठिकाणी मागणी वाढली आहे, तेथे किंमत कमी होण्याला काहीअंशी ब्रेक लागला आहे.

तज्ज्ञांच्या मते, रिअल इस्टेट बाजारात विश्‍वासाचे वातावरण तयार झाले आहे. यातून निवासी मालमत्ता महाग होण्याची शक्‍यता आहे. गेल्या काही काळात दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरात घराच्या किमती कमी झाल्या होत्या. त्याचवेळी मुंबई, हैदराबाद आणि पुण्यात घराच्या किमती दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष 2020 च्या मध्यापर्यंत बाजाराचा कल बदलण्याची चिन्हे आहेत. त्यात प्राइस ग्रोथमध्ये तेजी येईल, असे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.