Navratri Festival 2023 – श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Festival 2023) 15 ते 30 ऑक्टोबर कालावधीत होत आहे. 28 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा व 29 ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमानिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात.
नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहर व परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तुळजापूर ते सोलापूर (Solapur-Tuljapur road) या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
26 ऑक्टोबर रात्री 12 पासून ते 29 ऑक्टोबर या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वरील बंधने ही पोलिस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने व एसटी या वाहनांना लागू राहणार नाहीत.