सोलापूर – फॉर्च्युनर व बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघात माजी सरपंचासह अन्य् चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भीषण अपघात कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याण जवळ काल रात्री झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिदानंद सुरवसे असे अपघातात मृत्यू झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून अन्य तीन जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
मात्र धडक जोरदार बसल्यामुळे फॉर्च्युनरचा चक्काचूर झाला व यामधील बसलेल्या चौघांना जबर मार लागला व त्यांचा मृत्यू झाला. अन्य् मृतांना रुग्णालयात विजापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.