जिल्ह्यातील अनेक गावांच्या हद्दींना टाळे : चाकरमान्यांसाठी गावची वेसही दुरापास्त
पुणे – जगभर थैमान घालणाऱ्या करोनाने आता गावाची वेस ओलांडली आहे. शिरूर, वेल्हे तालुक्यात करोना बाधित आढळल्यामुळे जिल्ह्यातील इतर गावे अलर्ट झाली आहेत. त्यामुळे रक्ताची नाती, माताशी नाळ, जीवाभावाचे मित्र, अशी गावकुसातील ओळख असलेल्या आपल्याच लोकांना गावात येण्यापूर्वीच गावबंदीची भिंत घातली आहे. त्यामुळे मातीशी नाळ असलेल्या लोकांना गावची वेस कोसो दूर दिसत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने पुरेपूर काळजी घेण्यात येत असून गावामध्ये सर्व उपाययोजना करण्यात येत असून गावातील आरोग्य सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नसून आवश्यकता भासल्यास आरोग्य विषयक सुविधांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करू.
– बाळनाथ पवळे, ग्रामविकास अधिकारी, सणसवाडी
शासनाने दिलेल्या सुचनेनुसार गावातील सर्व मुख्य रस्ते बंद केले असून, आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करण्यात येणार असून, गावामध्ये दवंडी देत करोनाविषयी जनजागृती करत घरातच बसावे.
– रमेश सातपुते, सरपंच, सणसवाडी
सणसवाडी परिसरात एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला असल्याने या गावातील सर्व भाग बंद करण्यात आले असून कोणतेही वाहन गावामध्ये प्रवेश करणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे, नागरिकांनी घाबरून न जाता घरामध्ये राहून आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. राजेंद्र शिंदे, वैद्यकीय अधिकारी, शिरूर तालुका