बारामती / जळोची – गेल्या 10 वर्षापासून माढंरे कुटुंबिय पालखी सोहळ्याचे आयोजन करत आहे. बारामती, इंदापूर, दौंन्ड आदी भागातून या पालखी सोहळ्यासाठी साई भक्त येत असतात. या पालखी सोहळ्या दरम्यान सर्व साई भक्तांची राहण्याची, खाण्याची सोय साईच्छा सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात येते.
बारामती ते शिर्डी पालखी मार्गावर प्रत्येक मुक्कमाच्या ठिकाणी वृक्षारोपण करुन स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. यावेळी साईभक्त व मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, व आदी मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली होती.
पालखी सोहळ्याच्या माध्यामातून आम्ही नेहमीच सामाजिक कामे करत असतो. मागील वर्षापासून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम राबवत आहे. पुढील काळात आधिकाधिक लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच गोर गरीबांसाठी ट्रस्टच्या वतीने सामाजिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार आहोत.
बिरजू माढंरे – माजी, उपनगराध्यक्ष, बारामती नगरपालिका