राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे त्यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या निशाण्यावर आले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘राज्यात सध्या तरी ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही’ असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दरम्यान सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अब्दुल सत्तार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तेथील जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. मात्र या भेटीवेळी सत्तार आणि जिल्हाधिकारी यांच्यातील दारूच्या चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर करत कृषीमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
सचिन सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा? गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो.”
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022