मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत पोस्टमार्टम आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मॅनेजरसह या प्रकणातील संबंधित लोकांची चौकशी केली आहे.
यामध्ये सुशांतचा चार्टर्ड अकाऊंटंट संजय श्रीधर याचाही समावेश आहे. सुशांतचे वडील, तीन बहिणी, त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी, मॅनेजर, स्वयंपाक आणि घरकाम करणारे, बिझनेस मॅनेजर, पीआर मॅनेजर, सुशांतच्या पहिल्या मालिकेते दिग्दर्शक, रिया चक्रवर्ती, मुकेश छाब्रा यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी करणाऱ्या वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी यश राज फिल्मसच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. सुशांत सिंह राजपूतने २०१२ साली यश राज फिल्मस बरोबर करार केला होता. या करारावर आशिष सिंह आणि आशिष पाटील या दोघांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आशिष सिंह हे यश राज फिल्मसचे माजी उपाध्यक्ष आहेत तर आशिष पाटीलही तिथे वरिष्ठ पदावर होते.
याबद्दल आशिष सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मी कराराबद्दल कुठल्याही गोष्टी उघड करणार नाही. खूप खेळीमेळीच्या वातावरणात सुशांत करारामधून बाहेर पडला. त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. आम्ही दोन चित्रपट केले. काही चित्रपट पूर्णत्वाला जाऊ शकले नाहीत. सुशांत पाच वर्षांपूर्वी वायआरएफमधून बाहेर पडला. त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. कुठलाही वादाचा विषय नव्हता. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करुया.” असं ते यावेळी म्हणाले आहे.