मुंबई – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील २४ तासात देशात ९१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजार ३८० वर पोहचला आहे. मागील २४ तासात देशात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है।
जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 15, 2020
याचत ‘दंगल गर्ल’ बबिता फोगाटनं देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरताना वादग्रस्त ट्विट केलं. त्यात बबितानं शुक्रवारी एक व्हिडीओ पोस्ट करून तबलिगींवर निशाणा साधला आहे.
बबिता फोगाट ट्विट केले आहे की,’कोरोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकांची समस्या आहे आणि पहिली समस्या जाहिल जमाती आहे.’ असं ट्विट केले आहे या ट्विटमुळे सध्या सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर तिच्यावर टीका होत असून अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे.