मुंबई – अनिल कपूर आणि श्रीदेवी या सुपरहिट जोडीने गाजवलेला “मिस्टर इंडिया’ पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी तयार होतो आहे. यावेळी अनिल कपूरनी केलेल्या हिरोच्या रोलमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे. अशी चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु असतांना मिस्टर इंडियाचे डायरेक्टर शेखर कपूर नाराज झाल्याचं समजत आहे. तर अभिनेत्री अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
सोनम कपूरने पोस्ट शेअर केली आहे की,’मिस्टर इंडियाचा रिमेक बनविला जात आहे. आणि या संदर्भात माझे वडील अनिल कपूर तसेच शेखर कपूर यांना कुठलीही कल्पना नाही. याबाबत कुठल्याही सूचना दिल्या गेलेल्या नाही हा चित्रपट माझ्या साठी खास आहे कारण या चित्रपटातील मुख्य भूमिका माझ्या वडिलांनी साकारली होती. मात्र या चित्रपटाच्या रिमेक बाबत कुणीही माझे वडील ( अनिल कपूर ) आणि शेअर अंकलला विचारले नाही या चित्रपटाला दोघांनीही फार मेहनतीने बनविले आहे.’
तत्पूर्वी,मिस्टर इंडियाचे डायरेक्टर शेखर कपूर यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अली अब्बास जफर यांनी मिस्टर इंडिया 2 ची घोषणा करण्याआधी त्यांच्यासोबत बातचित करायला हवी होती. त्यांनी संवाद साधणं गरजेचं वाटल नाही.