…म्हणून अभिनेत्री गरिमा जैनचा सारखपुडा मोडला

मुंबई : शक्ती-अस्तित्व के एहसास की या मालिकेतील अभिनेत्री गरिमा जैन हीचा नुकताच साखरपुडा मोडल्याची बातमी समोर येत आहे. याविषयीची मामहिती खुद्द गरिमाने एका मुलाखतीत दिली आहे. एका मालिकेत आपण इंटिमेट सीन दिल्याने आपला साखरपुडा मोडला असल्याची कबुली गरिमाने दिली आहे.

13 जून 2019 ला गरिमा व राहुल सराफ यांचा साखरपुडा झाला होता. मात्र राहुलला गरिमाने मनोरंजन क्षेत्रात काम करणे आवडत नव्हते. यावरून गरिमा आणि राहुल यांच्यात सतत वाद होत होते त्यामुळे अखेरीस त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला. माझ्यामते, आम्ही घाईघाईत हे नाते तोडले. रोका सेरेमनीनंतरच आमच्यात वाद होत होते. कदाचित दोघांचेही वेगवेगळे क्षेत्र त्याचा कारणीभूत होते.मी मालिकेत इंटीमेट सीन्स देणे राहुलला मान्य नव्हते. मी स्क्रिनवर छोटे कपडे घालणे यालाही त्याचा विरोध होता. माझ्या मॉडर्न कपड्यांवरही त्याला आक्षेप होता. हे नाते टिकवण्याचे बरेच प्रयत्न करूनही शेवटी गोष्टी आणखी बिघडत गेल्या आणि अखेर आम्ही साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला, असे गरिमाने सांगितले. सध्या ती श्रीमदभागवत महापुराण या मालिकेत देवी इंद्राणीची भूमिका साकारते आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×