कोलकाता – देशभरामध्ये सध्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लॉक डाउनच दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. येत्या ३ मे रोजी लॉक डाऊनची मुदत पूर्ण होत असली तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता देशभरामध्ये पुन्हा एकदा लॉक डाऊनला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कोरोना प्रभावित नसणाऱ्या भागांमध्ये लॉक डाऊनचे नियम शिथिल करणार असल्याची माहिती दिली.
याबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, सर्व काही ठीक राहिल्यास राज्यातील ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये मोडणाऱ्या भागांमध्ये येणाऱ्या सोमवारपासून लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय लागू करण्यात येतील. यामध्ये किरकोळ दुकानांना निर्णयाचा समावेश असेल. असं असलं तरी रेड झोनमध्ये मोडणाऱ्या भागांमध्ये कोणत्याही सवलती देण्यात येणार नाहीत.