नांदुर : दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील 60 वर्षीय वृद्धास सर्दी, खोकला व घसा दुखत असल्याने संबंधित व्यक्तीला 25 एप्रिल रोजी राहू येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील व्यक्तीत कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. आज 29 एप्रिल रोजी सदरील व्यक्तीचा तपासणीचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दौंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दौंड तालुक्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे. दौंडच्या शेजारील बारामती, शिरूर, हवेली, इंदापूर या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण यापूर्वी आढळून आले होते. दरम्यान आज दौंड तालुक्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनतेने घाबरुन जाता कामा नये परिणामी स्वःताची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवहान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, दहिटणे गावाची नाकेबंदी करण्यात येणार असून आजूबाजूच्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करण्ययात येणार असल्याचे डॉ. अशोक रासगे यांनी सांगीतले.