मुंबई – हजार शब्दांत जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगते. आणि त्यासाठीच 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत “फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन’ यांच्या माध्यमातून 21व्या पीएसाय आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन 2023 चं आयोजन करण्यात आलं होत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी आपल्या फोटोग्राफी बद्दल अनेक आठवणी सांगितल्या. तसेच, आपण फोटोग्राफी का बंद केली याचा देखील त्यांनी खुलासा केला.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, “बऱ्याच दिवसानंतर माहेरची माणसं भेटली. कोणाचा फोटो कोणासोबत आणि कधी येईल सांगता येत नाही, म्हणून मी फोटोग्राफी थांबवली, मी एक्स फोटोग्राफर नाही होणार, वडिलांकडून कलेचा वारसा आहे तो घेणार.
कला रक्तात असावी लागते. कलाकृती अनेकांनी विकत घेतली आहे. पाहिजे तर कलाकृतीचं प्रदर्शन करतो आणि कुणाला विकत घ्यायची असेल तर त्यांनी घ्या,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.