बॉलीवूडमधील दबंग गर्ल अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या करिअरमध्ये येणाऱ्या चढ-उतारांवर धक्कादायक खुलासा केला आहे. सोनाक्षीने अवॉर्डवरून बॉलीवूडला चपराक लगावली आहे. आत्तापर्यंत आपण कोणाकडे काम मागितले नसून हा आपल्या नावावर मोठा रेकॉर्ड असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे. सोनाक्षी सिन्हा ही पहिली अभिनेत्री आहे जिने गेल्या 10 वर्षांत बॉक्स ऑफिसवर 1500 कोटींची कमाई केली आहे.
सोनाक्षीने एका मुलाखती दरम्यान करिअरमधील अनेक धक्कादायक असे खुलासे केले आहेत. यामध्ये सोनाक्षीने तिची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. ज्या पद्धतीने आपल्या चित्रपटासाठी सन्मान मिळायला हवा होता त्यापद्धतीने मिळाला नसल्याचेही तिने सांगितले. “दबंग’ चित्रपटाशिवाय फॅन्सनी तिच्या कोणत्याही चित्रपटाला पसंती दिली नाही. असे असले तरी देखील सोनाक्षीने आपल्या अभिनय आणि चबी लुकमुळे प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
बॉलीवूडमध्ये चांगले काम करणाऱ्यांना अवॉर्ड मिळत नाहीत, लोक प्रेम देतात यातच मी खूश असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे. जर कोणाचा मित्र आहे म्हणून मला अवॉर्ड मिळणार असले तर मला असा अवॉर्ड नको, असेही तिने स्पष्ट सुनावले.
दरम्यान, सोनाक्षीच्या “लुटेरा’ चित्रपटाला 2014 मध्ये बेस्ट ऍक्टरेस्टसाठी नॉमिनेशन देण्यात आल होते. “दबंग’ चित्रपटासाठी फिल्मफेयर अवॉर्ड देखील मिळाला. मात्र गेल्या 6 वर्षांत सोनाक्षीला एकही अवॉर्ड मिळालेला नाही आहे.