गाठी-भेटी : लोणावळा, नाणे मावळ दौऱ्यास शिक्षकांचा प्रतिसाद
लोणावळा : शिक्षकाच्या अनेक समस्या आहे यामध्ये जुनी पेंशन योजना, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्यासाठी विनाअट करण्यात या अशा विविध मागण्यांसाठी लढणार, असे मत जितेंद्र पवार यांनी लोणावळा येथे व्यक्त केले.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून, शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांनी मावळ तालुक्यातील लोणावळा व नाणे मावळ भागातील शाळेमधील दौऱ्यामध्ये शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
या वेळी लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे, ऍड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, अक्झिल्युम विद्यालय, व्ही. पी. एस. माध्यमिक विद्यालय, गुरुकुल माध्यमिक विद्यालय, नगरपालिका लोणावळा, पंडित नेहरू विद्यालय कामशेत शाळेतील शिक्षकांना भेटून त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या.
या वेळी पुणे जिल्हा शिक्षक परिषद उपाध्यक्ष पांडूरंग ठाकर, मावळ तालुका शिक्षक परिषद अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे,पुणे जिल्हा सल्लागार धनंजय नांगरे, तालुका सचिव वरिष्ठ गटकूळ, कार्याध्यक्ष भारत काळे, भाऊसाहेब खोसे, देवराम पारिठे, अशोक कोराड, सोपान ठाकर, संजय हुलावळे, नितीन तिकोणे, उमेश इंगूळकर उपस्थित होते. या दौऱ्याचे संयोजन मावळ तालुका शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आले होते.