मुंबई – चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे ‘अशोक सराफ’ म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ‘अशोक मामा..’ बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा त्यांनी जोरदार ठसा उमठविला आहे. म्ह्णूनच आज देखील ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. फॅशन, स्टाईल, ट्रेंड सर्व गोष्टींमध्ये अशोक मामा एकदम फिट बसायचे. अशोक सराफ यांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे.
विनोदाचा सम्राट ते फॅशनचा ट्रेंड सेटर अशी देखील ‘अशोक सराफ’ यांची एकेकाळी ओळख बनली होती. तुम्ही देखील अशोक मामांचे मोठे चाहते असला तर, एव्हाना ही गोष्ट तुमच्या नजरेतून चुकलेली नसेल. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी अशोक मामांनीसुद्धा एक नवा पायंडा पाडला होता. आणि तो म्हणजे ‘शर्टची दोन बटने उघडी ठेवाचा…’ त्यांची हीच अनोखी स्टाईल आज देखील बॉलिवूड मधील अनेक बडे कलाकार फॉलो करताना दिसतात. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत. स्वतः अशोक सराफ यांनी त्यांच्या या खास स्टाईल बद्दल खुलासा केला आहे.
शर्टची दोन बटने उघडी असण्यामागचं कारण एकतर फॅशन हे आहेच पण त्याचं खरं कारण नेमकं वेगळं आहे. एका प्रसिद्ध वुत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना अशोक मामांनी याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणतात… “शर्टची पूर्ण बटने लावल्याने मला अस्वस्थ वाटत असे. यामध्ये मला गुदमरल्यासारखं व्हायचं. आणि शर्टची दोन बटने उघडी ठेवल्याने फारच मोकळं आणि छान वाटायचं. आणि अशात अतिशय मोकळेपणाने कामही करता यायचं. आणि म्हणूनच मी आपल्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी ठेवत. परंतु सर्वांना ती फॅशन वाटू लागली आणि अशाप्रकारे हा नवा ट्रेंड सेट झाला”. असं ते यावेळी म्हणाले.
मराठी चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखले जाणारे हे हरहुन्नरी अभिनेता असणारे अशोक सराफ सर्वांनाच आपलेसे वाटतात. पांडू हवालदार’ , ‘कळत नकळत’, ‘भस्म’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’, ‘बनवाबनवी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका तुफान गाजल्या आहेत. आज देखील चाहते त्यांचा या भूमिका डोक्यावर घेतात आणि त्याच कौतुक देखील करतात. सुरुवातीपासूनच अभिनयाची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी 1969 साली ‘जानकी’ या चित्रपटात भूमिका करून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.