कॉर्नर पॉकेट करंडक खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धेचे आयोजन

पुणे – कॉनर्र पॉकेट क्‍लब तर्फे पहिल्या “पहिल्या कॉर्नर पॉकेट करंडक’ खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 26 ते 28 एप्रिल 2019 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत एकूण 60 हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना कॉनर्र पॉकेट क्‍लबचे संचालक चिंतामणी जाधव म्हणाले की, कॅंपमधील महात्मा गांधी रस्त्यावरील नव्याने उद्घाटन झालेल्या कॉनर्र पॉकेट क्‍लबमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत एकूण पुणे शहर आणि परिसरातील 64 खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेबाबत बोलताना चिंतामणी जाधव म्हणाले की, ही खुली स्पर्धा आम्ही केवळ पुणे आणि परीसरातील खेळाडुंपुरतीच मर्यादित ठेवली आहे. स्पर्धेची संख्या पण 64 खेळाडुंपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. ही 6-रेड स्नुकर स्पर्धा बाद फेरी पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण 60 हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या खेळाडूला 17 हजार रूपये आणि करंडक, उपविजेत्या खेळाडूला 8 हजार रूपये करंडक मिळणार आहे.

यासह उपांत्य फेरीतील खेळाडूंना चार हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुणांचा ब्रेक नोंदविणार्या खेळाडूला पाच हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू शिवम अरोरा, हसन बदामी, साद सय्यद, धवल गढवी, संकेत मुथा, अभिषेक बोरा, महिला राष्ट्रीय खेळाडू अरॉन्ता सॅंचेस, लियाकत शेख आदि मानांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याचे जाधव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.