बजाज फायनान्सच्या डिजिटली सक्षम शाखा

पुणे – बजाज फायनान्स ही ठेवी स्वीकारणारी नॉन-बॅंकिंग फायनान्शियल इन्स्टिट्युशन (एनबीएफसी) असून बजाज फायनान्स ग्रुपची शाखा आहे. पुण्यातील कॅंप, नळस्टॉप, फातिमानगर, पिंपरी आणि औंध भागात डिजिटली-सक्षम फिक्‍स्ड डिपॉझिट सेवा शाखा लॉंच करण्यात आल्या आहेत.

येत्या 12-24 महिन्यांत कंपनीची 40-50 शाखा सुरू करण्याची योजना आहे. या शाखा इंटरऍक्‍टीव्ह डिजिटल काउंटर्स, ऍलेक्‍सा कियॉस्क आणि वायफाय-क्षम टॅब्जनी सुसज्ज आहेत, ज्यामुळे ग्राहकांना व्यवहार, गुंतवणूक करता येईल, बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये फिक्‍स्ड डिपॉझिट जमा करण्यासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल.

बजाज फायनान्स लिमिटेडच्या रिटेल अँड कॉर्पोरेट लायबिलीटीजचे बिझनेस हेड सचिन सिक्का यावेळी म्हणाले की सध्याच्या अनेक माध्यमांव्यतिरिक्त डिजिटल मंचाच्या माध्यमातून आम्ही रिटेल डिपॉझिटर्स सेवा देत आहोत. बजाज फायनान्स फिक्‍स्ड डिपॉझिटसाठी आकर्षक असा 8.75% व्याजदर देते आहे, जो वरिष्ठ नागरिकांसाठी 9.10 टक्‍के याप्रमाणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.