वाघोली – हवेली तालुका भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सुप्रियाताई शिवाजीराव गोते यांनी हवेली तालुका महिला आघाडी कार्यकारणी जाहीर केली असून यात सुनीता आढाव यांची हवेली तालुका उपाध्यक्ष पदी, तर वाघोली शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्ष पदी स्नेहल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय वाघोली शहर सरचिटणीस पदी विद्याताई नरेंद्र पाटील, वाघोली शहर उपाध्यक्षपदी सोमा धर ताई यांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी हवेली तालुका महिला आघाडी भाजपा सरचिटणीस वंदनाताई शिवले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप सातव, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे व गणेश सातव , हवेली तालुका भाजप क्रीडा आघाडी अध्यक्ष विजय जाचक, आण्णा राजे शिवले ,शिवाजीराव गोते, गणेश जाधव , नरेंद्र पाटील, प्रदीप सातव व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.