वाघोली – श्री शंभुसाम्राज्य सेना वर्धापन दिन, शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचा स्मृतीदिन व शिक्षक दिनाचे औचित्य साधून शौर्यपीठ तुळापूर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन श्री शंभुसाम्राज्य सेनेच्या वतीने करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून वृक्षरोपण, रक्तदान शिबिर, कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या कुटुंबातील साध्या पद्धतीत विवाह सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे चंद्रशेखर घाडगे, सुभाष शेटे, दीपक नायक, अमृत पठारे, नम्रता कुदळे, बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, मोनिका लाकूडझोडे, चंद्रकांत वारघडे, नेहा ताकवले यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार, भारतीय अन्न धान्य मंडळाचे सदस्य योगेश केदार, अनुराधा नागवडे, सचिन सातपुते, परिसरातील गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शंभूभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन श्री शंभूसाम्राज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.