दुबई : भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज तसेच संघाच्या फलंदाजीचा कणा मानली जात असलेल्या महाराष्ट्राच्या स्मृती मानधना हिला ‘आयसीसी’ च्या २००९ या वर्षातील एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे.
Big shout out to the Indian quartet of @mandhana_smriti, @JhulanG10, @shikhashauny and @poonam_yadav24 for being named in the ICC Women’s ODI Team of the Year. 👏👏 pic.twitter.com/3J85tmtG3v
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2019
स्मृतीसह शिखा पांडे, झुलन गोस्वामी, पूनम यादव यांचा एकदिवसीय संघात तर राधा यादव, दीप्ती शर्माचा टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे.
Three cheers! The trio of @Deepti_Sharma06, @mandhana_smriti and @Radhay_21 is part of ICC Women's T20I Team of the Year. 👌👌 pic.twitter.com/9ADAC0L1P2
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2019
वर्षभरात खेळल्या जाणा-या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणा-या सर्वोत्तम खेळाडूंचा एक संघ आयसीसी जाहीर करते. त्यात या भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
२३ वर्षीय स्मृतीने ५१ एकदिवसीय सामने तर ६६ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात अनुक्रमे २ हजार २५ आणि १ हजार ४५१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत तिच्या नावे ४ शतके आणि १७ अर्धशतके आहेत. स्मृतीने २ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये ८१ धावा केल्या आहेत.