मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास १६० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच रजनीकांत यांच्या आगामी ‘दरबार’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर रिलीझ झाला आहे. ‘दरबार’ या चित्रपटातून जवळपास २५ वर्षांनी रजनीकांत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
दरम्यान, ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी रजनीकांत यांनी मीडियाशी सवांद साधला. अशी कोणती भूमिका राहिली आहे जी तुम्हाला साकारायची आहे असा प्रश्न रजनीकांत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रजनीकांत म्हणाले की,”मला आता चित्रपटांमध्ये काम करून ४५ वर्ष झाली आहे. पण एक अशी व्यक्तिरेखा आहे जी मी अजून एकदाही केली नाही ती म्हणजे तृतीयपंथीची भूमिका. ही व्यक्तिरेखा मला एकदा तरी करायची आहे”. असं रजनीकांत म्हणाले.