नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले असून अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला. तसेच या हल्ल्याचा निषेध म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील (दि. ७) जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी आल्याचे सुद्धा दीपिकाने स्पष्ट केलं होतं.
. @smritiirani takes down Deepika Padukone for supporting Bharat Tere Tukde Gang pic.twitter.com/XzqTmSjeaN
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 10, 2020
दरम्यान, आता केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणींनी दीपिकावर निशाणा साधला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या कि, “भारताचे तुकडे करू पाहणाऱ्यांसोबत आणि तरुणींच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करणाऱ्यांसोबत दीपिका पदुकोण उभी होती… याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही… ” असं त्या म्हणाल्या. एका कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. तसेच, या कार्यक्रमाचा व्हिडीओ भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.