फोटो काढायला आवडत नाही, असा एखादा विराळाच. कारण स्वत:चे छान छान फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणे हा सर्वात आवडीचा आणि मजेशीर छंद सर्वचजण जोपासताना दिसतायेत.
व्हॉट्स ऍपला स्टेटस ठेवताना फोटो छानच असला पाहिजे. कारण तुमचे स्टेटस सर्वांना आवडायला हवे. अशा वेळी फोटो कसे पाहिजे हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. मात्र काही खास पोजेस असल्यातर तुमचा ओटो आकर्षक दिसतो. फोटो काढताना एक पाय थोडासा वाकवून किंवा किंचित पुढे घेऊन फोटो क्लिक करा. यामुळे तुमचा कमनीय बांधा या फोटोमध्ये दिसतो. सरळ, ताठ उभे राहून फोटो काढू नका.
वन सायडेड फोटो काढताना हात थोडे वर असावे अथवा कमरेवर ठेवून फोटो काढावा. फोटो काढताना खांदा थोडासा वाकवा आणि मानही थोडी वाकवा यामुळे चांगला फोटो येतो. सुंदर, रेखीव फोटो येण्यासाठी डोळांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे फोटो पोजनुसार डोळ्यांचा कटाक्ष ठेवा. यामुळे फोटोतील डोळे समोरच्याच्या नजरेत भरतात. आणि फोटो सुंदर दिसतो.