मेष : घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.
वृषभ : महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. कामात विनाकारण झालेली धावपळ दगदग कमी होईल.
मिथुन : व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल.
कर्क : नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल.
सिंह : बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील.
कन्या : पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.
तूळ : अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल राहील. उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल.
वृश्चिक : कमी श्रमात जास्त यश मिळवाल. सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल.
धनू : नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. आरोग्य मात्र सुधारेल.
मकर : अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल.
कुंभ : सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल. महिलांना मनासारखे काम करता येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.
मीन : व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल.