इम्तियाज अलीच्या “लव्ह आज कल’च्या दुसऱ्या भागाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या अगोदरचाही त्याचा एक चित्रपट फारसा चर्चेत राहिला नाही.
त्यामुळे इम्तियाजने आता पुन्हा एकदा त्याचा फेव्हरिट रणबीर कपूरकडे मोर्चा वळवला असून लवकरच ते एकत्र काम करणार असल्याची बातमी येण्याची शक्यता आहे.
या दोघांनी अगोदर रॉकस्टार आणि तमाशामध्ये सोबत काम केले आहे. दोन्ही चित्रपट चांगले चालले. विशेष म्हणजे त्यांनी रणबीरच्या अभिनय कौशल्यावर व त्याच्या कपूर असण्यावर शिक्कामोर्तब केले.
रॉकस्टारमधील त्याच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. त्याने समीक्षकांना स्वत:ची दखल घ्यायला लावली अन् आपणही राज कपूर यांचे नातू असल्याचे कुठेतरी सिद्ध करण्यात त्याला यश आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार इम्तियाज एका वादग्रस्त संगीतकाराच्या जीवनावर चित्रपट करतो आहे. तसेच आत्महत्येच्या विषयावर सामाजिक संदेश देणारा चित्रपटही त्याला करायचा आहे.
यातील एक कथा रणबीरला आवडली असून त्याने तोंडी होकार दिल्याची बातमी आहे. लवकरच हे दोघे आणखी एक चांगला चित्रपट देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.