लघुउद्योजकांचे खासदारांना साकडे

पिंपरी – गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच त्याच समस्यांशी झुंजत असलेल्या लघु उद्योजकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आपल्या मागण्या देखील त्यांच्या समोर मांडल्या.
पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यालयात त्यांची भेट धेऊन सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

यावेळी औद्योगिक परिसरातील वीज, मुलभूत सुविधा, रेड झोन, सरकारी अस्थापानाकडून लघु उद्योगांना काम मिळणे, लघुउद्योगाना चालना , उद्योगासंबंधित केंद्र सरकारची कार्यालये पिंपरी चिंचवड शहरात उघडण्यात यावीत, या सर्व समस्या सुटतील अशी आशा उद्योजकांनी व्यक्‍त केली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, खजिनदार संजय ववले , संचालक प्रमोद राणे, योगेश बाबर, संपत मापारी, राजू जगदाळे, गुरुचरण सिंघ संधू, रोहित कदम, महाडिक, चांगदेव कोलते, वैद्य हुकूमचंद उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)