बालगोपाळांचे आवडते पर्यटन केंद्र कात्रज प्राणीसंग्रहालय

– धीरेंद्र गायकवाड

पुणे शहरातील कात्रज परिसरामध्ये वसविण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुणे शहरातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ बनले आहे. शहरातीलच नाही तर देश-विदेशातील पर्यटक सुद्धा या संग्रहालयाला भेट देतात. या प्राणीसंग्रहालयामुळे कात्रज परिसराला एक वेगळी ओळख सुद्धा मिळाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय म्हणून सुद्धा त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

पुणे शहरामध्ये पूर्वी 1953 मध्ये सात एकर जागेवर पेशवे पार्क तयार करण्यात आले होते. मात्र हे लहान असल्याने नव्याने नवीन प्राणी संग्रहालय करण्याची वेळ आली. व त्यानुसार 1997 साली कात्रज परिसरामध्ये एकशे तीस एकर जागा मिळवून त्यामध्ये हे प्राणी संग्रहालय तयार करण्यात आले. व 1999 साली या प्राणिसंग्रहालय पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. महाराष्ट्रातील अग्रगण्य प्राणीसंग्रहालय असे हे असणारे एकशे तीस एकर विस्तीर्ण जागे मध्ये आहे. आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या प्राणिसंग्रहालयात चे वन्यप्राणी ठेवण्यात आलेले आहे. ते पूर्णतः नैसर्गिक अधिवासामध्ये आहेत. या प्राणीसंग्रहालयातील एकूण 17 नैसर्गिक खंदकामध्ये ठेवण्यात आले आहे.

या प्राणी संग्रहालयामध्ये एक तलाव देखील आहे. या तलावाने सुमारे 29 एकर जागा व्यापली आहे. या प्राणिसंग्रहालय मध्ये एकूण 53 प्रजातीतील 434 प्रकारचे प्राणी पर्यटकांना पाहण्यासाठी मिळतात. तसेच या प्राणिसंग्रहालयात सर्पोद्यान देखील आहे. याठिकाणी प्राण्यांसाठी नैसर्गिक पद्धतीमध्ये खंदके तयार करण्यात आली आहेत. हे या प्राणी संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. सध्या या प्राणी संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी सफेद पट्टेदार वाघ, पिवळा पट्टेदार वाघ, बिबट्या, हरीण, चौशिंगा, हत्ती, यासह विविध प्राणी पाहायला मिळतात. तसेच प्राणीसंग्रहालयातील सर्पोद्यान मध्ये मुख्य आकर्षणामध्ये किंग कोब्रा, जाळीदार अजगर, सुसर, मगर, यासह विविध भारतीय साप पाहायला मिळतात. हे कात्रज परिसरातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय महाराष्ट्राची व पुण्याची ओळख झाली आहे तसेच पर्यटकांसाठी पुण्यातील हे मुख्य आकर्षण ठरत आहे. या प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. प्राणी संग्रहालयात दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्या, व उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मध्ये बच्चे कंपनीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गेल्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण भारतातून महाराष्ट्रातील जवळजवळ 17 ते 18 लाख पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे. या प्राणिसंग्रहालय मध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विविध उपाय योजना देखील केल्या गेल्या आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राणी संग्रहालयामध्ये बॅटरी ऑपरेटेड सहा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ती सशुल्क आहे. तर अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअरची निशुल्क सेवा देण्यात येते. आता पर्यटकांची संख्या वेगाने वाढत असताना, संग्रहालयामध्ये प्लास्टिक बंदी आहे.

प्राणिसंग्रहालयाच्या सेवेसाठी एकूणच 100 कर्मचाऱ्यांचा ताफा व प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षे साठी एकूण 61 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सध्या या राजीव गांधी प्राणी संग्रहालय याचे मुख्य वैशिष्ट्य या प्राणी संग्रहालयामध्ये जन्म घेतलेली चार वाघांचे बछडे हे आहेत. या प्राणी संग्रहालयामध्ये हे पहिल्यांदाच प्राणी प्रजोत्पादन कार्यक्रमाद्वारे या वाघांच्या बछड्यांचा जन्म झाला आहे .आणि हे उत्तम आरोग्य राखून आहे. आणि हे पर्यटकांना पाहण्यासाठी खंदकामध्ये देखील सोडण्यात आले आहेत.

या प्राणी संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवाविषयी आपुलकी व त्यांचे विषयी माहिती मिळण्यासाठी कार्यशाळा देखील घेतल्या जातात. “ओळख प्राणिसंग्रहालयाची” दोन दिवसीय मोफत कार्यशाळा घेतली जाते. तर “मैत्री करुया प्राणिसंग्रहालयशी” ही अर्धा दिवस मोफत कार्यशाळा घेतली जाते. अशाप्रकारे कात्रज परिसरातील मुख्य आकर्षण आणि कात्रज ची ओळख असलेले, हे प्राणी संग्रहालय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व नैसर्गिक विविधतेने नटलेले आपल्याला पहायला मिळते. या प्राणिसंग्रहालय मध्ये एकूण 108 प्रकारचे विविध प्रकारचे वृक्ष देखील अस्तित्वात आहेत. असे हे कात्रज परिसरातील प्राणीसंग्रहालय शहरातील एक प्रमुख पर्यटनस्थळ बनले आहे.

प्राणी संग्रहालयाची वैशिष्ट्ये
1) एकशे तीस एकर जागा. त्यामध्ये 29 एकर जागेमध्ये तलाव.
2) नैसर्गिक अधिवास मध्ये 434 प्राणी 53 प्रजातीतील.
3) प्राणीसंग्रहालयातील सर्पोद्यान त्यामधील विविध सर्प.
4) पर्यटकांसाठी बॅटरीवरील वाहने.
5) पर्यटकांसाठी ठिकठिकाणी विश्रांतीसाठी शेड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, ठीक ठिकाणी सुलभ शौचालय.
6) अपंगांसाठी व्हीलचेअरची मोफत सेवा.

प्राण्यांची निगा राखणे, तसेच नैसर्गिक खंदकाची निर्मिती करून प्राण्यांना योग्य वातावरण निर्माण करणे, व पर्यटकांना योग्य सुविधा पुरवून, व त्यामधूनच वन्यजीवन विषयी पर्यटकांमध्ये जनजागृती करणे, आवड निर्माण करणे, हे मुख्य उद्दिष्ट या प्राणिसंग्रहालयाचे आहे.असे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.