भुज – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात झोप लागल्याने त्याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
जिगर पटेल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. काल पटेल यांना राज्याच्या नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण विभागाने निलंबित केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मुख्य अधिकाऱ्यांना डोळा लागल्याचे दृष्य कॅमेऱ्यांनी टिपले होते. त्यानंतर काहीं वेळातच त्यांना निलंबीत करण्याचा आदेश देण्यात आला.
“गुजरात सिव्हिल सर्व्हिस (शिस्त आणि अपील) नियम, 1971 च्या नियम 5(1)(अ) अंतर्गत गंभीर निष्काळजीपणा आणि कर्तव्यात निष्ठा नसल्याबद्दल या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला. या कार्यक्रमात, मुख्यमंत्री पटेल यांनी कच्छमधील सुमारे 14,000 भूकंपग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या निवासी घरांच्या मालकीची कागदपत्रे वितरित केली.