दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सहावा संघ निश्चित झाला आहे. हा संघ हॉंगकॉंगचा असून त्यांनी संयुक्त अरब अमिराती संघाचा पात्रता सामन्यात 8 गडी राखून पराभव करत आशिया स्पर्धेत स्थान मिळवले.
पात्रता स्पर्धेत हॉंगकॉंग संघाने सहा गुण प्राप्त करत अपराजित राहताना मुख्य स्पर्धेत प्रवेश केला. या संघाचा समावेश अ गटात भारत व पाकिस्तान यांच्यासह करण्यात आला आहे. आशिया करंडक स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरु होत आहे.
अ गटातील सामने
– 27 ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
– 28 ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
– 30 ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
– 31 ऑगस्ट – भारत विरुद्ध हॉंगकॉंग
– 1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
– 2 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग
मुळ वेळापत्रकानूसार ही स्पर्धा यजमानपद मिळवलेल्या श्रीलंकेत होणार होती. मात्र, त्यांच्या देशातील आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा अमिरातीत हलवण्यात आली.
स्पर्धेच्या सलामीचा सामना शनिवारी श्रीलंका व अफगाणिस्तानमध्ये होणार आहे. तर, रविवारी भारत व पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत होणार आहे.