करोनाचे 24 तासांत सापडले 135 रुग्ण
राजगुरूनगर (पुणे)- खेड तालुक्यात मागील 24 तासांत नव्याने 135 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले. तर सहा व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यात बाधित व्यक्तींच्या संख्या 4768 वर पोहचली आहे.
तालुक्यात मागील 24 तासांत राजगुरूनगर 22, चाकण 29, आळंदी 10 या तीन नगरपरिषदांमिळून 61 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तर कडूस, खरपुडी, रासे कुरुळी येथे प्रत्येकी एक, तर राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील तोरणे 1, चांडोली 1, दोंदे 2, कडूस 3, रानमळा 1, आंबेठाण 2, चिंबळी 2, खालुंब्रे 2, खराबवाडी 4, कुरुळी 3, मेदनकरवाडी 5, म्हाळुंगे 4, नाणेकरवाडी 3, शेलगाव 4, शिंदेगाव 1, शिंदेवासुली 5, वराळे 3, वासुली 4, वडगाव घेनंद 2, येलवाडी 2, औदर 1, वाजवणे 1, धामणे 1, भांबुरवाडी 2, राक्षेवाडी 3, सातकरस्थळ 1, भोसे 3, मरकळ 1, रासे 4, शेलपिंपळगाव 1, निमगाव 3, खरपुडी बुद्रुक 1, या 32 गावात एकूण 76 जण नव्याने पॉझिटिव्ह सापडले आहेत.