पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज नव्याने सहा करोनाचे रुग्ण आढळून आले, त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 89 झाली आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तालुक्यात नव्याने सहा करोनाबाधित रुग्ण आढळून आले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथे एक पुरुष, बावधनमध्ये दोन रुग्ण – एक महिला व एक पुरुष, भूगाव येथे एक महिला, हाडशी येथे एक पुरुष व हिंजवडी येथे एक पुरुष रुग्ण सापडला आहे. शुक्रवारी (दि. 3) तालुक्यात विविध भागांत बारा रुग्ण आढळून आले होते. आज त्यात सहा रुग्णांची भर पडल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 89 झाली आहे.