गडचिरोली- नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेला यश येत असून आज सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये पाच महिला नक्षलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्मसमर्पण केलेल्या या सर्वांवर तब्बल 31 लाख 50 हजार रुपयांचा इनाम ठेवण्यात आलेला होता.
संदिप उर्फ महारुवड्डे (वय 30), कमांडर कासुन्सूर दलाम, मनीषा उर्फ गंगाबाई कुरचामी (30), स्वरूपा उर्फ सरिता अटला (वय 23), अग्निलिया निला तुलावी (वय 25), ममिता उर्फ ममता पल्लो (20) आणि तुलसी उर्फ मासे कोरमी (24) अशी आत्मसमर्पण करणाऱ्यांची नावे आहेत.
या सर्व नक्षलवावाद्यांचा हत्या, चकमकी आणि स्फोट घडविण्याच्या कटात सक्रिय सहभाग असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या वर्षभरात आतापर्यत 29 नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले आहे.