“सर फोटोसाठी काय पण..’ मास्क न घातल्यामुळे नेटकऱ्यांकडून पंतप्रधान पुन्हा ट्रोल; सोशलवर मिम्सचा धुमाकूळ

मुंबई – आजपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. मात्र लस घेताना मोदींच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मोदींनी आपला मास्क हातात ठेवला आहे. 

मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली त्यांनी मास्क न घातल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत मोदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातलेला हे दाखवणारा फोटोही पोस्ट केलाय. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातीलअनेक मिम्स तुफान व्हायरल होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.