नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसागणिक वाढतच जात आहेत. तर दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे. पहिन्या भराच्या कालावधीत सिलेंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. यामुळे आता सर्व सामान्यांचे बजेट कोलमडणार असल्याचे दिसत आहे.
आज सिलेंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ ढाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात १०० रूपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी गॅसचे दर २५ रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रूपये, त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५० रूपयांची वाढ करण्यात आली होती. देशात पुन्हा एकदा विनाअनुदानीत सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ झाली आहे.
या वाढीनंतर आता दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर ७९४ रूपयांवरून वाढून ८१९ रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे नवे दर ८१९ रूपये, कोलकात्यात ८४५.५० रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता ८३५ रूपये झाले आहेत. जानेवारी महिन्यात कंपन्यांनी या दरात कोणतेही बदल केले नवते परंतु फेब्रुवारी महिन्यात सलग तीनदा हे दर वाढवण्यात आले.
१९ किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या दरात ९०.५० रूपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता या सिलेंडरची किंमत १६१४ रूपये झाली आहे. यापूर्वी हे दर १५२३.५० रूपये इतके होते. त्याचप्रमाणे मुंबईतही हे दर १५६३.५० रूपये आणि कोलकात्यात १६८१.५० आणि चेन्नईत हे दर १७३०.५० रूपये इतके झाले आहेत. गॅसचे नवे दर पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी इंधन कंपन्यांच्या संकेतस्थळावरही माहिती मिळू शकते. या ठिकाणी इंधन कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करत असते.