गायिका ‘वैशाली माडे’ लवकरच हाती घेणार राष्ट्रवादीचा झेंडा; ‘या’ दिवशी होणार पक्ष प्रवेश

मुंबई – बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका ‘वैशाली माडे’ आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या ३१ मार्च रोजी वैशाली मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत.

यापूर्वी देखील अनेक मराठी कलाकारांनी आपल्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा घेतला आहे. वैशाली दुपारी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. यासाठी एक दिमाखदार सोहळा देखील आयोजित करण्यात येणार आहे.  

 वैशाली माडे ही शेतकरी कुटुंबातून आली आहे. हिंदी, मराठी चित्रपटांसह तिने अनेक मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ देखील गायली आहेत. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आली होती. 

‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटातील ‘पिंगा’ हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. अलीकडेच तिनं ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया..’ हे गाणं गायलंय आहे. महाराष्ट्रासह देशभरात वैशालीचे असंख्य फॅन्स आहेत. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.