नवी दिल्ली – भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी गुरुवारी फ्रेंच ओपन स्पर्धेतून पराभवासह बाहेर पडली. यासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने थायलंडच्या सुपानिडा कातेथोंगविरुद्धच्या दुसऱ्या फेरीतील एकेरी सामन्यात पहिला गेम 21-18 असा जिंकला पण दुसऱ्या गेममध्ये 1-1 अशी बरोबरी असताना तिला गुडघ्याच्या समस्येमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली.
त्याचवेळी, तिसरे मानांकित सात्विक आणि चिराग यांना शेवटच्या-16 सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेटियावान जोडीकडून 23-25, 21-19, 19-21 असा पराभव पत्करावा लागला.